खिशातील रोख व एटीएममधून काढली रक्कम
एका पान टपरी चालकाला चार आरोपीनी कारमध्ये उचलून नेत त्याला एका बंद अपार्टमेंटमध्ये नेऊन दांड्याने बेदम मारहाण केली व त्याच्या जवळील रोख रक्कम आणि एटीएम कार्ड व त्याचा पिन घेऊन रक्कम काढली ही घटना वाळूज औधोगिक परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात घडली या प्रकरणी चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाली पाटोळे, अमोल गायकवाड,उमेश जाधव, अक्षय गायकवाड (सर्व राहणार वडगाव कोल्हाटी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अक्षय सुरेश फुंदे वय-21 (रा.वडगाव) हा तरुण वैष्णोदेवी मंदिर जवळ उभा असताना तेथे एका इंडिगो कार मधून बाली,अमोल, उमेश आणि अक्षय हे चौघे आरोपी तेथे आले व त्यांनी रस्त्यावर उभ्या अक्षय ला चारचाकी कार मध्ये बसवून अण्णा भाऊ साठे चौकात बंद असलेल्या एका अपार्टमेंट मध्ये घेऊन गेले.तेथे अक्षयला एका दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली व त्याच्या खिशातील सात हजार रुपये रोख हे आरोपी बाली याने काढून घेतले.एवढ्यावरच हे आरोपी थांबले नाही त्यांनी अक्षच्या खिशातील एच.डी. एफ.सी बँकेचे एटीएम काढले व धमकी देत त्या एटीएम चे पिन घेऊन त्या खात्यामधील 11 हजार 500 रुपये काढून घेतले. या प्रकरणी टपरी चालकांच्या तक्रारी वरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घेरडे हे करीत आहेत.